PPrintShubh.in

मुलाखतीची तयारी

कोणते प्रश्न विचारले जातात, ते का विचारतात, आणि तुमचं उत्तर लिहून ठेवा.

“तुमच्याबद्दल सांगा” — तुमच्या Resume वरून रचना

  • (इथे तुम्ही हे काम का करू इच्छिता ते तुमच्या शब्दांत जोडा.)

ही फक्त मांडणी आहे. यात तुमच्या शब्दांत भर घाला — घोकून म्हणू नका.

Resume सापडला नाही, त्यामुळे वरची रचना रिकामी आहे. Resume तयार केला तर ती आपोआप भरेल.

Resume तयार करा

तुमच्याबद्दल

  • तुमच्याबद्दल थोडं सांगा.

    हे का विचारतात: तुमचं शिक्षण, अनुभव आणि हे काम का — हे दोन मिनिटांत नीट क्रमाने सांगता येतं का, हे पाहतात. आयुष्याची कहाणी नको.

  • हेच काम / हीच कंपनी का निवडली?

    हे का विचारतात: तुम्ही कंपनीबद्दल आधी काही वाचलं आहे का, आणि हे काम तुमच्या कौशल्याशी कसं जुळतं हे सांगता येतं का.

  • तुम्हालाच का घ्यावं?

    हे का विचारतात: स्वतःची स्तुती नव्हे — तुमच्या कोणत्या कामाचा त्यांना थेट उपयोग होईल ते.

  • पुढच्या काही वर्षांत काय करायचं आहे?

    हे का विचारतात: तुम्ही या कामात टिकाल का, आणि शिकण्याची तयारी आहे का.

HR चे प्रश्न

  • तुमची बलस्थानं कोणती?

    हे का विचारतात: सांगितलेल्या गुणाला एक खरं उदाहरण जोडता येतं का. उदाहरणाशिवाय शब्द रिकामे वाटतात.

  • तुमची कमजोरी कोणती?

    हे का विचारतात: प्रामाणिकपणा, आणि त्यावर तुम्ही काय करत आहात. “मी खूप मेहनत करतो” असं उत्तर लगेच ओळखलं जातं.

  • आधीची नोकरी का सोडली / का सोडत आहात?

    हे का विचारतात: जुन्या मालकाबद्दल वाईट न बोलता कारण सांगता येतं का.

  • कामात खंड पडला असेल तर त्याबद्दल सांगा.

    हे का विचारतात: सरळ खरं कारण. खंड असणं ही अडचण नाही — लपवणं अडचण आहे.

  • टीममध्ये मतभेद झाला असेल असा प्रसंग सांगा.

    हे का विचारतात: तुम्ही तो कसा सोडवला — कोण बरोबर होतं यापेक्षा हे महत्त्वाचं.

  • कामाचा ताण असताना तुम्ही कसं हाताळता?

    हे का विचारतात: एक खरा प्रसंग आणि तुम्ही काय केलंत.

कामाबद्दलचे प्रश्न

  • Excel मध्ये तुम्ही कोणती कामं करता?

    हे का विचारतात: फक्त टायपिंग की फॉर्म्युले, फिल्टर, रिपोर्ट.

  • एकाच वेळी अनेक कामं आली तर प्राधान्य कसं ठरवता?

    हे का विचारतात: ठरवण्याची पद्धत आहे का, की गोंधळ.

  • कागदपत्रं आणि नोंदी कशा सांभाळता?

    हे का विचारतात: शिस्त — नंतर कागद सापडतो का.

पगाराबद्दल

  • तुमची पगाराची अपेक्षा किती?

    हे का विचारतात: तुम्ही या कामाचा बाजारभाव तपासला आहे का. एक आकडा नव्हे, एक रास्त पल्ला सांगा.

  • सध्याचा पगार किती आहे?

    हे का विचारतात: खरं सांगा — पडताळणी होऊ शकते. सोबत तुमच्या जबाबदाऱ्या सांगितल्या तर संदर्भ मिळतो.

  • कधीपासून रुजू होऊ शकाल?

    हे का विचारतात: तुमची नोटीस पिरियडची स्पष्ट कल्पना आहे का.

तुम्ही विचारावेत असे प्रश्न

  • या पदावर रोजचं काम कसं असेल?

    हे का विचारतात: हा प्रश्न विचारल्याने तुम्हाला कामात खरा रस आहे हे दिसतं — आणि तुम्हालाही खरं चित्र कळतं.

  • पहिल्या सहा महिन्यांत तुम्हाला काय अपेक्षित आहे?

    हे का विचारतात: अपेक्षा आधीच स्पष्ट होतात, आणि तुम्ही गंभीर आहात हे दिसतं.

  • मी कोणासोबत काम करेन?

    हे का विचारतात: टीम आणि रिपोर्टिंग कोणाला — हे आधी माहीत असणं उपयोगाचं.

आम्ही तुमची उत्तरं लिहीत नाही. तयार उत्तर मुलाखतीत टिकत नाही — पुढचा प्रश्न विचारला की ते उघडं पडतं. उत्तर तुमचंच असावं.

याची Printed Copy हवी आहे?

PrintShubh वर मागवा